Ad will apear here
Next
‘उबर इट्स’ची सेवा पुण्यात सुरू
पुणेः घरपोच खाद्यसेवा देणारे ‘उबर इट्स’ हे ऑन डिमांड फूड डिलिव्हरी अॅप आता पुणे शहरातही दाखल झाले आहे. याद्वारे तीनशे रेस्टॉरंटसशी भागीदारी करून पुणे शहर व आजुबाजूच्या परिसरातील ग्राहकांना खाद्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

सध्या विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि संगमवाडी या परिसरात ही सेवा देण्यात येत असून, आता पुणेकरांना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ त्यांच्या आवडत्या मलाका स्पाईस,  चैतन्य पराठाज् आणि ब्लू नाईल यांसारख्या विविध रेस्टॉरंटमधून घरबसल्या मागवता येणार आहेत.

याबाबत बोलताना उबर इट्स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड म्हणाले, ‘सात शहरांमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता ‘उबर इट्स’ने पुणे शहराकडे कूच केली आहे. प्रसिद्ध  रेस्टॉरंटसशी भागीदारी करून  चांगले अन्नपदार्थ लोकांना पुरवण्यासाठी कटीबद्ध असलेल्या उबर इट्सला ग्राहकांचा चांगला पाठिंबा लाभला आहे. भारतीय लोक राईडसाठी जास्तीत जास्त  वापरत असलेल्या उबर अॅपचा 'उबर इट्स' हा स्वतंत्र भाग असून केवळ एका बटणावर वेगात फूड डिलीव्हरी करता यावी, यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे.पुणे शहर हे महाविद्यालये व कार्पोरेट कंपन्यांचे माहेरघर असल्याने येथे हे अॅप सादर करताना आम्हाला फार उत्साह व आनंद वाटत आहे. पुणेकरांचे  खाद्यसंस्कृतीवर फार प्रेम आहे. या शहरात अनेक छोट्या खाणावळी, कॅफेज् आणि फाईन डाईन रेस्टॉरंट आहेत. आमचे भागीदार आणि उबर डिलीव्हरी नेटवर्कच्या मदतीने पुणेकरांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठीचे उत्तम अन्न पुरवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’

उबर इट्सची सुरुवात २०१४ मध्ये लॉसएन्जेलिस येथे एक छोटेखानी डिलिव्हरी पायलट म्हणून करण्यात आली. त्यानंतर, २०१५ मध्ये टोरंटो इथे याला स्वतंत्र अॅप्लीकेशनचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत अत्यंत जलद, दर्जेदार अन्नपदार्थ पुरवणारे हे एकमेव व्यासपीठ ठरले असून आता २९ देशांमधील या १३० शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. भारतात, मे २०१७ मध्ये मुंबईत 'उबर इट्स'ची सुरुवात झाली. अवघ्या सात महिन्यात ही सेवा मुंबई, दिल्ली, गुडगाव, बेंगळूरू, चेन्नई, चंडीगड, हैद्राबाद आणि आता पुण्यातही सुरू करण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZXTBK
Similar Posts
पीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू पुणे : शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे नवीन दालने सुरू केली आहेत.
‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’मध्ये रुफटॉप सोलर प्लॅंट पुणे : भारतातील सर्वांत मोठी रुफटॉप सोलर डेव्हलपर असलेल्या आणि या बाजारपेठेत १५.८ टक्के हिस्सा असलेल्या ‘क्लिनमॅक्स सोलर’ कंपनीने पुण्यातील ‘आयसीएआर – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’साठी रुफटॉप सोलर प्लँट विकसित आणि कार्यान्वित केला आहे. ७० केडब्ल्यूपी क्षमतेच्या या रुफटॉप ग्रिड सोलर इन्स्टॉलेशनचे उद्घाटन
स्वादिष्ट वॅफल्सची दुनिया ... आता फर्ग्युसन रोडवर पुणे : ‘वॅफल्स’ हे मुळचे पाश्चात्त्य मिष्टान्न भारतीयांना अगदीच काही नवीन नाही, मात्र आता ते सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खवैय्यांमध्ये ‘वॅफल्स’ची चलती दिसून येत आहे. पुणेकर खवैय्यांनाही ‘वॅफल्स’ने भुरळ घातली आहेच. अशा या अनोख्या ‘वॅफल्स’ची दुनियाच फर्ग्युसन रोडवर खुली झाली आहे. विशेष म्हणजे
‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ पुणे : दर्जेदार सॉलिडवूडपासून बनलेल्या आकर्षक डिझाइन्सच्या फर्निचरचे ‘सोलवूड व्हेंचर’ हे भव्य पाच मजली दालन कोंढवा येथे सुरू झाले असून, नुकतेच याचे उद्घाटन अभिनेते सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, निवृत्त अप्पर वनरक्षक पांडुरंग मुंढे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language